शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 14:57 IST

लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.

अंबाजोगाई ( बीड) -: पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय -३३) याने रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.

 बीड लोकसभा मतदार संघातील मतमोजणी झाली. यात भाजपा च्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवाचे शल्य मनात बोचत असल्याने व हा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील युवकाने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पांडुरंग सोनवणे हा अत्यंत गरीब कुटुंबातील युवक होता.तो भारतीय जनता पक्ष व पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक होता. हा पराभव त्याने खूप मनाला लावून घेतला.व जीवनयात्रा संपविली. पांडुरंग हा अल्पभूधारक आहे.त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक मुलगी  व लहान मुलगा आहे. या दुर्घटने मुळे पांडुरंग यांच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे.

मतमोजणी दिवशीच केला होता आत्महत्येचा प्रयत्न.... -लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पांडुरंग सोनवणे हा पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर खूप दुःखी झाला होता. त्याच दिवशी त्याने  आत्महत्या करणार असल्याचे ग्रामस्थांना बोलून दाखविले. गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे व ग्रामस्थांनी त्याची समजूत काढली. व त्याला आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक.अशी विनंती ही केली होती.मात्र निराश झालेल्या पांडुरंग याने शेवटी आत्महत्या केली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Beedबीड