पंकजा मुंडे मंत्रिपदाचा देणार राजीनामा

By Admin | Updated: February 23, 2017 17:10 IST2017-02-23T15:59:50+5:302017-02-23T17:10:28+5:30

परळीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.

Pankaja Munde resigns for the post of minister | पंकजा मुंडे मंत्रिपदाचा देणार राजीनामा

पंकजा मुंडे मंत्रिपदाचा देणार राजीनामा

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 23 - राज्यातील ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. परळीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंकजा मुंडे राजीनामा देणार असल्याचं म्हणाल्या आहेत.
 
परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. पंकजा मुंडेंचा परळीवरचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपात पंकजा मुंडेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
(Solapur ZP Election - बार्शीमध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ)
 
पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलं आहे.
 

 

Web Title: Pankaja Munde resigns for the post of minister