शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Pankaja Munde: 'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 14:25 IST

Pankaja Munde: 'माझ्यावर अनेकदा खालच्या पातळीची टीका झाली, मी कधीच कोणाविरोधात बोलले नाही.'

बीड- आज विजयादशमी/दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज दसरा मेळाव्यांची धूम पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगावात सुरू असलेल्या मेळाव्याची जोरदार चर्चा आहे. पंकजा मुंडेचें भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक जमले आहेत.

'हा चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा'यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना कधी संघर्ष चुकला नाही, मलाही चुकणार नाही, असे म्हटले. पंकजा म्हणतात की, 'मेळावा म्हटलं की, टीका होते, चिखलफेक होते. पण आमच्या मेळाव्यात काय होईल, हे सर्वांनाच माहित आहे. आमचा हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

'मी कोणावर टीका करणार नाही'त्या पुढे म्हणतात की, 'मी कुणाविषयी काय बोलणार...मी माझ्या आयुष्यात, मुंडे साहेबांचे विरोधक किंवा माझे विरोधक, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांनाही कधीच काही बोलले नाही. मी कधीच संधीचा फायदा घेत, टीकाकारांना प्रत्युत्तर दिले नाही. मी कधीच कोणाविषयी वाईट किवा खालच्या पातळीवरचे भाष्य केले नाही, ते आमच्या रक्तातच  नाही,' असं पंकजा म्हणाल्या. तसेच, 'हकीकत को तलाश करना पडता है, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती है |' हा शेरही त्यांनी यावेळी ऐकवला.

'माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण'दरम्यान, मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, 'माझा मेळावा हा गरिबांचा, वंचिताचा, गावकडचा साधारण मेळावा आहे. आमचा मेळावा डोंगरात होतो, डोक्यावर ऊन असतं, तरीही लोकांचा उत्साह असतो. इथे ना खुर्च्या लागतात, ना खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी लागते. लोकं आपल्या घरातूनच भाकरी बांधून आणतात. माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा आहे. माझ्यासाठी ही वेगळीच ताकद आहे, मला मोठा आशीर्वाद आहे,' असे पंकजा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडBJPभाजपाDasaraदसरा