शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

सलग दोन पराभवानंतर पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होतंय; पण माजी खासदार प्रीतम मुंडेंचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:52 IST

विधानसभा, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी

बीड : विधानसभा आणि लोकसभा अशा सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. पराभवानंतर पंकजा यांचे पुनर्वसन केले जातेय. पंकजा यांचा २०१९ पासून सुरू असलेला राजकीय वनवासही यानिमित्ताने थांबू शकतो. परंतु दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांचे काय? असा सवाल समर्थकांमधून विचारला जात आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा त्यांचे भाऊ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्या फारशा सक्रिय नव्हत्या. त्या जरी आमदार नसल्या तरी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या रूपाने खासदार घरात होते. आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी मिळून त्या हॅट् ट्रिक साधणार, असे सांगितले जात होते. पंकजा यांनीही आपण बहीण प्रीतम यांच्या जागेवर अतिक्रमण करणार नसल्याचे अनेकदा सांगितले; परंतु ऐनवेळी पक्षाने डॉ. प्रीतम यांचे तिकीट कापून त्यांचीच मोठी बहीण पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे उभा होते. यावेळी जातीय राजकारण झाल्याने पंकजा मुंडे यांना फटका बसला आणि अवघ्या साडेसहा हजार मतांनी पंकजा यांचा निसटता पराभव झाला. विधानसभा पाठोपाठ लोकसभेतही पंकजा यांचा पराभव झाल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांमधून केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून, विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपून त्यांचे पुनर्वसन भाजपकडून केले जात आहे. यामुळे भाजप आणि समर्थकांमधून जल्लोष केला जात आहे.

मागितले १०० दिवस अन् १५ दिवसांतच उमेदवारीपंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आष्टी, शिरूर आदी ठिकाणी समर्थकांनी जीवनयात्रा संपविली होती. त्यांच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडे यांनी १६ जून रोजी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आत्महत्या करू नका. पुढील १०० दिवस द्या, सर्व पलटून टाकू, असे विधान केले होते; परंतु अवघ्या १५ दिवसांतच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

प्रीतमला विस्थापित होऊ देणार नाहीलोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. प्रीतम मुंडे या देखील सोबत होत्या. प्रीतमला मी विस्थापित होऊ देणार नाही. लवकरच तिचेही पुनर्वसन करेल, असा शब्द पंकजा यांनी दिला होता. परंतु लोकसभेत स्वत: पंकजा यांचाच पराभव झाल्याने त्याच विस्थापित झाल्याची चर्चा होती. परंतु समर्थकांची मागणी आणि ओबीसी नेत्या म्हणून राज्यभरात असलेली ओळख पाहता पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे या आमदार झाल्यावर त्या बहीण डॉ. प्रीतम यांचे पुनर्वसन करू शकतात, अशी चर्चा आहे.

धनंजय मुंडेंचा मार्ग मोकळाराज्यात सध्या भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना यांच्यात युती आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे सध्या युतीत आहेत. लोकसभेत पराभव झाल्याने त्या परळीतून विधानसभा लढवणार, अशी चर्चा होती. परंतु भाजपने पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युती राहिली तर धनंजय मुंडे हेच युतीचे परळीतून उमेदवार असू शकतात.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपा