शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

बीडमध्ये रेल्वे आली रे... दिवगंत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 23:59 IST

सद्यस्थितीत अहमदनगर-बीड-परळी हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती

ठळक मुद्दे आज हायस्पीड रेल्वेचं बीडमध्ये आगमन झाल्याचा फोटो शेअर करत गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली आहे. या रेल्वेवर गोपीनाथ मुंडेंचा फोटोही लावण्यात आला होता.

मुंबई/बीड - जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळी  नगरहून सोलापूर वाडी व तेथून आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे. पटरीवरून  रेल्वे धावल्याचे पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याने आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर, आज या मार्गावर हायस्पीड रेल्वे धावली. पंकजा मुंडेंनी या रेल्वेचा फोटो शेअर करत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या आहेत. 

सद्यस्थितीत अहमदनगर-बीड-परळी हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती. पण, बुधवारी सकाळी नगरवरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाली. बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळाले. सोलापूर वाडी, कडा, आष्टी या ठिकाणीहून रेल्वे धावल्यामुळे ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात, आज आणखी एक स्वप्न साकार झाल्याचे पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. पंकजा यांनी आज हायस्पीड रेल्वेचं बीडमध्ये आगमन झाल्याचा फोटो शेअर करत गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली आहे. या रेल्वेवर गोपीनाथ मुंडेंचा फोटोही लावण्यात आला होता.

बाबा!! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो, हमारे हर आगाज में आप हो, जो देखो बीड वासियों की आंखो में आज, सच कहती हूं खुशी से नम हर आंखो के अंदाज में आप हो..प्रसंग जो भी हो हर नारे की आवाज में आप हो !! बाबा, या सगळ्या प्रक्रियेत आपण आहात, येथील प्रत्येकाच्या आवाजात आपण आहात, असे पंकजा यांनी ट्विटरवरुन म्हटलंय. 

देवेंद्र फडणवीसांचेही मानले आभार

पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले. त्यानंतर, फडणवीस यांनी पंकजा मुंडेंचे ट्विट रिट्विट करत मुंडे भगिनींचे कौतुक केले. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी तुम्ही केलेल्या पाठपुराव्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार... असेही फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

गोपीनाथ मुंडेंनी दिलं योगदान

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठी अडचणी होत होती. 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र, त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले. दरम्यान, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली.

आज याच मार्गावर हायस्पीड रेल्वे धावली असून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील सर्वात मोठ्या रेल्वे पुलावरून हायस्पीड रेल्वे आज बुधवारी सुखरूपपणे धावली. हा 15 स्पॅनचा पूल असून प्रत्येकाची लांबी 30.5 मीटर आहे. म्हणजेच जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा तर शंभर फूट उंचीचा हा पूल आहे.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेPankaja Mundeपंकजा मुंडे