शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
2
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
3
Sanjay Raut : "लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं"; राऊतांचा टोला
4
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
5
हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...
6
तापसीने केली प्रिती झिंटासोबत स्वत:ची तुलना; म्हणाली, 'मी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते, कारण...'
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
8
'फलंदाजांचा कर्दनकाळ' ट्रेंट बोल्टची निवृत्तीची घोषणा; तडकाफडकी घेतला निर्णय, IPLचे काय?
9
Nirjala Ekadashi 2024: आजच्या दिवशी न जेवताच पोटावरून हात फिरवत भीमाचे घ्या नाव; जाणून घ्या कारण!
10
"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."
11
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
12
Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक
13
विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली, १० वर्षे लिव्ह इनमध्ये राहिली अन् नंतर मिळाला धोका
14
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
15
Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!
16
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी
17
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
18
मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या
19
बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो
20
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी

'देशात शंभर टक्के भाजपाचेच सरकार येणार', परळीतील बुलेट रॅलीत पंकजा मुंडेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 8:44 AM

मोटरसायकल कार्यकर्त्यांच्या रॅलीत 'फिर मोदी को लाना है, देश को बचाना है' गाण्याने उत्साह संचारला

बीड - जिल्ह्यातील परळी येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व खा डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या वतीने मोटार सायकलवर 'विजयी संकल्प रॅली' काढण्यात आली. या रॅलीनंतर जनतेला संबोधित करताना, पंकजा मुंडेंनी केंद्रात 100 टक्के भाजपाचेच सरकार येणार असल्याचे म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीबांसाठी खूप काम केलयं. त्यामुळे संपूर्ण जनमत भाजपच्या बाजूने असल्याचेही पंकजा यांनी म्हटले.  

केंद्र व राज्य सरकारने जनहितासाठी केलेल्या कामा विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हयातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने विजयी संकल्प रॅली काढण्यात आली. परळी शहरात पालकमंत्री ना पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी 4.30 वा. गोपीनाथ गडावरील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेवून ही रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीत मतदारसंघातील भाजपचे गावोगांवचे हजारो कार्यकर्ते आपल्या मोटरसायकलसह उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गोपीनाथ गड येथून निघालेली ही रॅली तळेगांव, टोकवाडी, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पूल, आर्यसमाज, राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार, अंबेवेस, तळ, पुन्हा टॉवर, स्टेशन रोड, एक मिनार चौक, बस स्टँड, योगेश गार्डन, ना. पंकजा मुंडे यांचे कार्यालय, शिवाजी चौक, वडार कॉलनी मार्गे वैद्यनाथ मंदिर येथे आली व त्याठिकाणी रॅलीचा समारोप झाला. 

नागरिकांकडून भव्य स्वागत 

गोपीनाथ गड ते वैद्यनाथ मंदिर मार्गावर ठिक ठिकाणी रस्त्यावर नागरिकांनी रॅली थांबवून फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत केले. रॅलीविषयी जनतेच्या मनात असलेली कमालीची उत्सुकता यावेळी दिसून आली. पालकमंत्री ना. पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी खुल्या जीपमधून नागरिकांना हात उंचावून अभिवादन करत त्यांचे स्वागत स्विकारले. रॅलीत अग्रभागी सुरू असलेल्या 'फिर मोदी को लाना है, देश को बचाना है' या गाण्याने सर्वत्र उत्साह संचारला होता. विशेष म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन करत रॅलीचा थाटात समारोप झाला. 

पुन्हा भाजपचेच सरकार येणार 

या विजयी संकल्प रॅलीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व जोश भरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेसाठी काम केले असून विविध विकास योजना त्यांच्यासाठी राबविल्या आहेत, संपूर्ण जनमत सध्या भाजपच्या बाजूने असल्याने केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार शंभर टक्के येणार आहे असा विश्वास पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यां समोर बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, खा. डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज बीड व गेवराई येथे विजयी संकल्प रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. 

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा