पालवण रस्ता खराब; दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:28 IST2021-05-03T04:28:09+5:302021-05-03T04:28:09+5:30

बीड : शहरातील धानोरा रोडकडे जाणाऱ्या नगर रोड ते पालवन चौक भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते बुजवण्यासाठी ...

Palwan road bad; Demand for repair | पालवण रस्ता खराब; दुरुस्तीची मागणी

पालवण रस्ता खराब; दुरुस्तीची मागणी

बीड : शहरातील धानोरा रोडकडे जाणाऱ्या नगर रोड ते पालवन चौक भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते बुजवण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देत उपोषण केले. मात्र, काही ठिकाणचे खड्डे थातूरमातूर पद्धतीने बुजविले. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने वाहने आदळत आहेत.

इंटरनेट सेवेची गती मंद

बीड : काही दिवसांपासून बीड शहरात दूरसंचारची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते, तर दुसरीकडे बीटीएस टॉवरची क्षमता कमी पडू लागल्याने ग्राहकांना फोन संपर्क करताना तांत्रिक अडथळे येत आहेत.

पालसिंगण परिसरात

हातपंप नादुरुस्त

बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, ज्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांमधून केली जात आहे.

Web Title: Palwan road bad; Demand for repair