ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे पळी-ताम्हण बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST2021-01-20T04:33:25+5:302021-01-20T04:33:25+5:30

ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे. समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यवसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास ...

Pali-Tamhan Bajao Andolan of Brahmin Samaj Sangharsh Samiti | ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे पळी-ताम्हण बजाओ आंदोलन

ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे पळी-ताम्हण बजाओ आंदोलन

ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे. समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यवसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळाला १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. के जी टू पी जी शिक्षण मोफत करण्यात यावे. समाजावर केल्या जाणाऱ्या बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासारखा तत्सम कायदा करून कारवाई करण्यात यावी.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. पुरोहित समाजाला मासिक ५००० रु. मानधन सुरू करण्यात यावे. कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात. या व अन्य मागण्यांसाठी केज तहसील कार्यालयासमोर पळी- ताम्हण वाजवून धरणे आंदोलनात करण्यात आहे. धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर, श्रीधर खोत, श्रीराम शेटे, अनंत कोकीळ, विश्वास शेटे, विजय क्षीरसागर, सुनील कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, प्रदीप कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, पी. एस. लहुरीकर, व्यकंट पांडव, अतुल कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, उद्धव रामदासी, राहुल कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, अतुल मुथळे, अभिजित शेटे, अभय कुलकर्णी, गुणवंत जोशी, आदी समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: Pali-Tamhan Bajao Andolan of Brahmin Samaj Sangharsh Samiti