सारणी (आनंदगाव) येथील तरुणांनी संतोष सोनवणे व बप्पासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे गावात दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे ...
बीड तालुक्यातील नेकनूर येथील महावीर सुरवसे खून प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालयाने १४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. २३ वर्षे खटला चालल्यानंतर १४ पैकी ९ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपिने कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्याने तक्रार दाखल करण्यास मुलगी पुढे आली नव्हती. ...
: बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे ...
शुभकल्याण मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या येथील शाखेत दोनशेवर खातेदारांचे सुमारे दीड कोटी रूपये अडकले आहेत. वारंवार चकरा मारूनदेखील मुदतठेवींचे पैसे मिळत नसल्याने खातेदारांमधून संताप व्यक्त होत आहे ...
नगर पालिकेकडे वीज वितरणचे ७ लाख रुपये थकीत आहेत. या वसुलीसाठी वीज वितरणने पालिकेची ३ दिवसापूर्वी वीज कापली आहे. या विरोधात आता पालिकेने विविध करांपोटी कंपनीवर जवळपास पावने दोन कोटींची बाकी काढत नोटीस बजावली आहे. ...