ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बदलीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून नेट कॅफेवर जागरण आणि बदलीचा ताण सहन न झाल्यामुळे साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे (४९) यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला ...
मागील दोन दिवसांपासून शिक्षक बदलीचा नेट कॅफेवर फॉर्म भरण्यासाठी रात्रभर जागरण आणि बदली कुठे होईल याच्या भीतीचा ताण सहन न झाल्यामुळे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे( वय ४९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ...
बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेने कंबर कसली आहे. गुरुवारी सकाळपासूनच प्लास्टिक व कॅरीबॅग बंदी संदर्भात कारवाईची मोहीम हाती घेत अवघ्या ३ तासांत तब्बल अडीच क्विंटल कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. ...
हर्सूल जेलमध्ये त्याला सराईत गुन्हेगाराच्या कोठडीत टाकले. सराईत गुन्हेगाराने आपल्याकडील ‘सर्व गुण’ मित्राला बहाल केले. हेच मार्गदर्शन घेऊन कारागृहाबाहेर आल्यानंतर बनावट नोटा तयार करून कमिशनवर विकण्याचा प्रकार बीडमधील शेख शकूर ऊर्फ राणाभाई याच्या अंगल ...
विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. यावेळी त्याचा शोध न लागल्याने तात्काळ औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते. ...
शासन नियमानुसार पंचायत समिती सदस्यांना कोणताच वैयक्तिक विकास फंड नसतो. परंतु; आपल्या कार्यक्षेत्रात आपणच फंड आणून विविध विकास कामांसोबतच इतर अनेक कामे करून त्यावर स्वत:चे नाव टाकून केवळ जाहिरातबाजी करण्याचा नवीन फंडा पंचायत समिती सदस्यांनी आणला आहे. ...
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक ...
शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) विविध कामांसाठी येणा-या सर्वसामान्य व्यक्तींना कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांकडून अरेरावी करून दलालांना खुर्चीवर बसवून पाहुणचार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी समोर आले आहे. ...