तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांंकडून दोन महिन्यांपासून गाळप केलेल्या उसाचे बिल अदा न केल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले ...
महालोकअदालतमध्ये तडजोड होऊनही जिल्ह्यातील शिरूर कासार आणि पाटोदा तालुक्यातील भूसंपादन झालेल्या ५५ गावांतील शेतकऱ्यांना शासनाकडून मावेजाची रक्कम प्राप्त होऊनही चार महिन्यांपासून ती मिळालेली नाही. ...
नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटीकरण रद्द करावे या इतर मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत. ...
देवदर्शनासाठी जालना येथे नातेवाईकांकडे गेली. मंदिरात ओळख झाली. नंतर मोबाईलमुळे बोलणे वाढले आणि प्रेम घट्ट झाले. यातूनच त्याने तिला घेऊन धूम ठोकली. दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला ...
प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे, नवजात बालकाचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी विभागीय कार्यालयावर सकाळी मूक मोर् ...
लाच प्रकरणात अटक केलेल्या पोलीस हवालदाराला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे ...