ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मनकॉट जिनींगमध्ये शनिवारी सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा ह. मु. माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ...
परळीच्या मुंडे रुग्णालयामध्ये २०१२मध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे दाम्पत्यासह अवैध गर्भपातावेळी मृत्यू झालेल्या महिलेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायालाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ...
केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम पुन्हा करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्या मार् ...
राज्य सरकारने शुक्रवारी नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी आणखी ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आतापर्यंत राज्याने या मार्गाला ८६६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. ...