राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:27+5:302021-06-03T04:24:27+5:30
स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. गट अ) शालेय स्तर मुले / मुली , विषय : महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खा. ...

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. गट अ) शालेय स्तर मुले / मुली , विषय : महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खा. शरद पवार यांचे योगदान, माझा आवडता महापुरूष, ऑनलाईन शिक्षण व भावी पिढी, जनतेच्या प्रश्नांशी भिडणारा नेता अमरसिंह पंडित. गट ब) महाविद्यालयीन मुले / मुली , विषय : महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खा. शरद पवार यांचे योगदान, कोरोनाचे सामाजिक राजकीय शैक्षणिक परिणाम, कोरोना जनजागृती माझी भूमिका, जनतेच्या प्रश्नांशी भिडणारा नेता अमरसिंह पंडित असे आहेत.
प्रत्येक स्पर्धकाने दिलेल्या कोणत्याही एका विषयावर आपले मत व्यक्त करावे. स्पर्धकाने कमीत कमी ७ मिनिटांचा व्हिडिओ तयार करावा आणि तो व्हिडिओ परीक्षक रवी देशमुख यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकाने आपला परिचय भाषणाच्या सुरूवातीस जास्तीत जास्त अर्ध्या मिनिटात द्यावा. स्पर्धकाने आपले आधारकार्ड व शाळेत अथवा महाविद्यालयात शिकत असलेला पुरावा द्यावा. स्पर्धकाने आपले मत मांडलेला व्हिडिओ ८ जून २०२१ पर्यंत पाठवावा. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ३००१ रूपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय पारितोषिक २००१ रुपये व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येईल. राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक राजेश्वर चव्हाण यांनी केले आहे.