कांदा लागवड व विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST2021-01-22T04:30:07+5:302021-01-22T04:30:07+5:30
आष्टी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा लागवड व विक्री व्यवस्थापन याविषयीचे मार्गदर्शन शिबिर कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ...

कांदा लागवड व विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
आष्टी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा लागवड व विक्री व्यवस्थापन याविषयीचे मार्गदर्शन शिबिर कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित केले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती दत्तात्रय जेवे, सचिव हनुमंत गळगटे यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पिकाची घ्यावयाची काळजी व उत्पादन वाढविण्यासाठी करावी लागणारी फवारणी, खते या विषयी मार्गदर्शन शिबिर बुधवार २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश धस, तर बाबासाहेब पिसारे (कृषिभूषण) व कांदातज्ज्ञ शेतकरी, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती कडा संचालक मंडळ यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सभापती दत्तात्रय जेवे, सचिव हनुमंत गळगटे यांनी केले आहे.