जैविक कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:59+5:302020-12-27T04:24:59+5:30

सुविधा द्याव्यात नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. मागील महिन्यापासून निर्बंध ...

Organic waste on the streets | जैविक कचरा रस्त्यावर

जैविक कचरा रस्त्यावर

सुविधा द्याव्यात

नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. मागील महिन्यापासून निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेत्यांसह इतर व्यापाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.

एटीएमवर रांगा

बीड : अनेक बँकांचे ग्राहक बँकेतील गर्दी टाळण्यासाठी एटीएमद्वारे पैसे काढतात. मात्र मागील आठ दिवसांपासून शहरातील अनेक एटीएममध्ये रक्कम भरली जात नसल्याने एटीएमसमोर रांगा दिसत आहेत.

स्वच्छतागृहाची दुर्दशा

चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांसाठी असलेले शौचालय बंद असल्यामुळे त्यांची देखील कुचंबणा होत आहे.

तूर फवारणीला वेग

बीड : खरीप हंगामातील पिकांना परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसला होता. मात्र, अशाही स्थितीत तालुक्यात तुरीचे पीक चांगल्या स्थितीत बहरले आहे. सध्या शेतकरी तूर फवारणीस प्राधान्य देत आहेत.

Web Title: Organic waste on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.