बैलासमोर पुंगी वाजवून इंधन दरवाढीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:00+5:302021-02-05T08:23:00+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे यांच्या ...

बैलासमोर पुंगी वाजवून इंधन दरवाढीचा विरोध
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे यांच्या उपस्थितीत गेवराई येथील कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपासमोर अनोखे प्रतिकात्मक ‘बैल के आगे बिन बजाना आंदोलन’ करण्यात आले. यावेळी बैलासमोर पुंगी वाजवून जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नसलेल्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी ॲड. श्रीनिवास बेदरे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारच्या जनताविरोधी निर्णयांमुळे सध्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. यात सातत्याने वाढच होत असून, सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाहनचालकांना, मालवाहतूकदारांना याचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणाऱ्या दरवाढ़ीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी बैलासमोर पुंगी बजावो आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ ताबड़तोब मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात कडूदास कांबळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण अजबकर, बळीराम गिराम, शेख अलिंम, बाळासाहेब आतकरे, विशाल जंगले, राजू पोपळघट, संभाजी अजबकर, नीलेश माळवे, बालाजी बांडे, प्रवीण भरती, आल्तफ शेख, कारण बोरुडे, राजू पाटील, मनुसार भाई, गोटू सावंत, रवी नाईक, शेख शकील, माऊली, सोनू भरती, महादेव रोकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.