सिध्देश्वर बंधाऱ्याचा तळ पडला उघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:02+5:302021-06-24T04:23:02+5:30

दोन दिवसांचा लाॅकडाऊन शिरूर कासार : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून, शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा ...

Open the bottom of Siddheshwar dam | सिध्देश्वर बंधाऱ्याचा तळ पडला उघडा

सिध्देश्वर बंधाऱ्याचा तळ पडला उघडा

दोन दिवसांचा लाॅकडाऊन

शिरूर कासार : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून, शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा व ज्यांना परवानगी आहे, अशा सेवा वगळता बाकी सर्व दुकाने दोन दिवस बंद ठेवली जात आहेत. नुकसान होत असले तरी कोरोना रोखण्यासाठी, नियमावलींचे पालन करणेच क्रमप्राप्त असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे वर्दळही थंडावलेली असते.

टाळ मृदंगावर धूळ, विण्याच्या तारांवर गंज

शिरूर कासार : कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी मंदिरे बंद ठेवल्याने पंधरा महिन्यांपासून सार्वजनिक भजन, कीर्तनाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे भजनाचे साहित्य अडगळीत पडले आहे. टाळ मृदंगावर धूळ साचली, तर विण्याच्या तारांना गंज चढल्याचे बोलले जात आहे. उघड दार देवा आता उघड दार देवा, अशी प्रार्थना भजनी मंडळांकडून केली जात आहे.

लोखंडी अवजारांचा वापर वाढला

शिरूर कासार : शेती आणि शेतकरी यांच्यात बैल आणि लाकडी अवजारे असे अतूट नाते आहे. मात्र, आता कालपरत्वे यांत्रिकी शेती होत असल्याने बैलांची कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. लाकडी औत, तिफन आदी साहित्य आता लोखंडी निघाल्याने सुतार कामांचा ओघ लोहार कामांकडे वर्ग झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Open the bottom of Siddheshwar dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.