शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

देशातील एकमेव पुरूषोत्तमपुरी देवस्थान विकासापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:38 IST

संपूर्ण भारत देशात एकमेव असे भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदिर अद्याप विकासापासून कोसोदूर राहिले आहे.

ठळक मुद्देआजपासून सुरू होणार अधिकमास : महिनाभर चालणाऱ्या यात्रेमध्ये येतात लाखो भाविक

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : संपूर्ण भारत देशात एकमेव असे भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदिर अद्याप विकासापासून कोसोदूर राहिले आहे. या पौराणिक अनमोल ठेव्याचे जतन करून या तीर्थक्षेत्राला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा देवून भुतळीच्या या पुरूषोत्तमाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. बुधवारपासून सुरू होणा-या अधिकमास यात्रेची तयारी पूर्ण झाली असून महिनाभर चालणा-या या यात्रेत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोप-यातून भाविक दर्शनासाठी येतात.

पुरूषोत्तममास अर्थात धोंड्याचा महिना. या महिन्याला हिंदू धर्मात असाधारण महत्व असते. या महिन्यात श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे अधिकमास उत्सव यात्रा भरतो. या पर्वकाळात महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येथे दाखल होतात. गोदावरी काठावर वसलेले हे पुरूषोत्तमपुरी गाव राष्ट्रीय महामार्ग २२२ वर माजलगाव-गेवराई दरम्यानच्या सारवरगावपासून १० कि.मी. अंतरावर आहे. दर तीन वर्षांनी येणाºया या पर्वकाळात येथे लाखो भाविक रोज येत असतात. परत पुढील तीन वर्षांनीच ही यात्रा भरते. यावेळी १६ मे पासून १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार असल्याने या यात्रेतील ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान राज्यकर्ते येथील सोयी-सुविधांसाठी पुन्हा उदासीन होतात. त्यांना यात्रा आल्यानंतरच या ठिकाणची आठवण येते.

या तीर्थक्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा विशेष दर्जा देऊन येथील रस्ते, भक्तनिवास, मंदिर दुरूस्ती, पार्किंग व्यवस्था, परिसर स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून रस्ते विकास करणे आवश्यक आहे. परंतु लोकप्रतिनिधी व शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने भाविक भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. अरूंद रस्त्यामुळे वाहनांची कोंडी होते.

पवित्र पापनाशिनी गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम १५०० वर्षांपूर्वी झाल्याचा शीलालेख येथे आहे. या मंदिराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदिर (उत्तराखंड) पध्दतीचे आहे व शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदिर आहे व ही दोन्ही मंदिरे जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदिर हे वृंदावनातील कृष्णमंदिराची प्रतिकृती असल्याचे दिसते.मुख्य पुरूषोत्तम मंदिरातील पुरूषोत्तमाची मूर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्भुज पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र , पद्म असून मूर्ती मनमोहक अशी आहे.

या मंदिराबाबत पुराणात आख्यायिका सांगितली जाते. गोदावरी तिरापलीकडे भस्मटेकडी असून येथे पुराणकाळी ऋषी-मुनी यज्ञयाग करत. परंतु या परिसरात शार्दूल नावाचा राक्षस यज्ञयाग उधळून लावत व पंचक्रोशीतील जनतेला छळत होता. त्याचा हा अत्याचार दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे ऋषीमुनींनी भगवान महाविष्णूकडे न्याय मागितला व त्यांचा धावा केल्यावरून महाविष्णूने पुरूषोत्तमाचा अवतार घेऊन या राक्षसाचा वध केला व हा पुरूषोत्तम या मंदिरात स्थिरावला. त्याने सुदर्शनाने गोदावरी शांत केली. त्यामुळे गोदावरीतील त्या ठिकाणाला चक्रतीर्थ हे नाव पडले व आजही या ठिकाणचे पाणी हे लालसर दिसत असल्याचे भक्तगण सांगतात. आजतागायत भक्तमंडळी अधिकमास महिन्यात याठिकाणी येऊन या तीर्थात स्नान करून पुरूषोत्तमाचे दर्शन घेतात.निजामाकडून न्याय, पण सरकारकडून अन्यायपौराणिकदृष्ट्या प्रसिध्द असणाºया या मंदिराला निजाम सरकारने भरघोस मदत देऊन या तीर्थक्षेत्राला न्याय देण्याचे काम केले होते, यामुळे या भागात अनेक कामे झाल्याची साक्ष दिसत आहे. परंतू आपले शासन मात्र या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देत नसल्याने अन्याय होत असून, मंदिराचा विकास खुंटला आहे.मंदिर व परिसर विकासापासून कोसोदूर राहिले आहे. त्यामुळे भक्तवर्गात संताप व्यक्त केला जातो. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी व दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३०+३ धोंडे अर्पण करतात व सुखाची कामना करतात. त्यामुळे या महिन्यात राज्यातून अनेक महिला या यात्रेत सहभागी होत असतात.मंदिरात प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या रु पात पूजा करण्याची प्रथा अनादीकाळापासून चालू आहे. हे मंदिर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना असून मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगतात व मंदिरातला गरु डध्वज पंढरपुरची आठवण करून देतात.

हैदराबाद येथे ताम्रपट व तांब्याचा गरु डनिजाम राजवटीत या स्थळाला फार मोठा मान होता व निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमिनी दिल्या होत्या व याबाबत ताम्रपट देऊन त्यावर या जमिनी कोणाकडे वहितीसाठी द्याव्यात याचा उल्लेख होता. परंतु हे ताम्रपट व तांब्याचा गरुड हैदराबाद येथील पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहित केला असल्याने मंदिराचा विकास खुंटला असल्याचे भाविक बोलतात.

धोंड्याचा महिनाभारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, या महिन्यात पुरूषोत्तमाला ३०+३ असे सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे.दर तीन वर्षांनी येणा-या या अधिकमासाचे वर्णन ‘धोंडे महात्म्य’ या ग्रंथात असून, बारा महिन्याचे बारा स्वामी असतात. परंतु उरी-सुरीच्या तेराव्या महिन्याचा स्वामी कोण होणार? या वरून पुरूषोत्तमाने हे स्वामित्व स्वीकारले व तेव्हापासून या महिन्याला पुरूषोत्तमास हे नाव पडल्याचा उल्लेख आढळतो. या महिन्यात जावयांना पुरणाचे धोंडे खाऊ घालण्याची प्रथा ही महाराष्ट्रातील घराघरात जोपासली जाते.

टॅग्स :BeedबीडtempleमंदिरMarathwadaमराठवाडा