ग्रामपंचायत सदस्यच मागू लागले सरपंचांना कमिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:55+5:302021-07-02T04:23:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामातून कमिशनची मागणी करत तालुक्यातील मांगवडगाव ग्रामपंचायत सदस्यांनी महिला सरपंचांसह त्यांच्या पतीस ...

Only Gram Panchayat members started demanding commission from Sarpanch | ग्रामपंचायत सदस्यच मागू लागले सरपंचांना कमिशन

ग्रामपंचायत सदस्यच मागू लागले सरपंचांना कमिशन

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामातून कमिशनची मागणी करत तालुक्यातील मांगवडगाव ग्रामपंचायत सदस्यांनी महिला सरपंचांसह त्यांच्या पतीस धमक्या दिल्याची लेखी तक्रार युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ही ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.

केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीनंतर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींची चौकशी केल्याने यात तालुक्यातील १०८ ग्रामपंचायती दोषी आढळून आल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. असे असतानाच मांगवडगाव येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांतील कमिशनवरून झालेला वाद युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गेला आहे.

मांगवडगावच्या सरपंच अनिता प्रताप जाधव यांनी ३० जूनरोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायत सदस्य तानाजी लिंबराज फरके हे त्यांना ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांच्या रकमेच्या बिलातून कमिशनची मागणी सरपंच अनिता व त्यांचे पती प्रताप जाधव यांना करत असल्याचे तसेच पैसे न दिल्यास यापुढे ग्रामपंचायतीमार्फत कोणतेही विकासाचे काम करू देणार नाही, तसेच ग्रामपंचायतीच्या सभेत गोंधळ घालण्याची धमकी देत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे नमूद केले आहे.

010721\img-20210701-wa0020.jpg

मांगवडगाव सरपंच अनिता जाधव यांनी ग्राम पंचायत सदस्याच्या विरूद्ध पोलीसात केलेली हीच ती तक्रार.

Web Title: Only Gram Panchayat members started demanding commission from Sarpanch