नुसताच पत्रव्यवहार : जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवूनही मिळेना जागा
By Admin | Updated: October 22, 2015 21:04 IST2015-10-22T21:04:39+5:302015-10-22T21:04:39+5:30
जिल्हा कार्यालयाप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे एक कार्यालय असावे तसेच त्या ठिकाणी योग्य ते तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी नेमण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली होती.

नुसताच पत्रव्यवहार : जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवूनही मिळेना जागा
जिल्हा कार्यालयाप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे एक कार्यालय असावे तसेच त्या ठिकाणी योग्य ते तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी नेमण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली होती.
■ परंतु केवळ जागा नसल्याने हे प्रस्ताव धूळखात पडलेले आहेत. येथील कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा होऊनही दखल नाही.
■ प्रयोगशाळा असावी असेही एका पत्रात सहायक आयुक्तांनी नमूद केले होते. परंतु याकडेही दुर्लक्ष झालेले दिसते. सध्या येथील कारभार ४ खोल्यांमधून चालत असल्याचे दिसून येते. बीड : येथील अन्न व औषध प्रशासनाला मागील अनेक वर्षांपासून हक्काचे कार्यालय मिळालेले नाही. आजही किरायाच्या जागेतून या कार्यालयाचा कारभार चालतो. याबाबत जिल्हाधिकार्यांकडे वेळोवेळी जागेची मागणी करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील अधिकारी-कर्मचार्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येते.
सहायक आयुक्त मुंबई यांनी २0१२ साली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा कार्यालय व उपविभागीय कार्यालयासाठी जागेची मागणी केली होती.
तसेच कार्यालयाच्या दृष्टीने एखादी चांगली इमारत द्यावी, असेही पत्रात नमूद केले होते. त्याप्रमाणे धानोरा रोडवरील वर्ग तीनच्या कर्मचार्यांचे क्वॉर्टर कार्यालयासाठी देण्याचे ठरले.
परंतु अधिकार्यांनी पाहणी केल्यानंतर त्या जागेला नापसंती दर्शविण्यात आली. तेंव्हापासून ते आजपर्यंत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी पत्रव्यवहार व भेटी घेण्यात आल्या. परंतु कसलीच दखल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष हे येथील अधिकारी-कर्मचार्यांच्या कामावर परिणाम करीत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)