ऑनलाईन क्लासमुळे मोबाईल, लॅपटॉपची वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:37+5:302021-06-29T04:22:37+5:30
मोबाईल मार्केटला सुगीचे दिवस; भावही वाढले अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्व शाळा, - महाविद्यालयात ऑनलाइनद्वारे शैक्षणिक ...

ऑनलाईन क्लासमुळे मोबाईल, लॅपटॉपची वाढली मागणी
मोबाईल मार्केटला सुगीचे दिवस; भावही वाढले
अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्व शाळा, - महाविद्यालयात ऑनलाइनद्वारे शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली. यामुळे मोबाईल, लॅपटॉप, टॅबची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
लॉकडाऊन नंतरही घरातून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांनी टॅब आणि लॅपटॉप घेण्यास पसंती दर्शविली. त्यामुळे अनलॉकनंतर मोबाईलची विक्री वाढली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी अतिरिक्त वाढ नोंदवली गेली आहे. साहजिकच सीमकार्ड कंपन्यांनाही रिचार्ज करणाऱ्यांची संख्या वाढली. जूनमध्ये लॅपटॉप, मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले. शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने सीमकार्ड वाढल्यामुळे नेहमीपेक्षा अधिक दुरुस्ती, विक्री सोबत मोबाईल रिचार्जमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. टॅब, लॅपटॉप, मोबाईलमध्ये सर्वाधिक विक्री मोबाईलची झाली आहे. त्यात भारतीय बनावटीच्या मोबाईलला जास्त मागणी आहे. सीमकार्डच्या पोर्ट करण्यासोबत नवीन सीमच्या मागणीतही वाढ झाली आहे. दोन महिन्यांपासून मोबाईलची सर्व दुकाने बंद असल्याने काही जणांचे चार्जर, बॅटरी आणि अतिवापरामुळे मोबाईल बंद पडले होते. त्यामुळे दुरुस्तीसाठीही ग्राहकांची गर्दी होताना दिसली. कमी किमतीतील मोबाईलला जास्त मागणी असून, अनेक ग्राहकांचा कल मोबाईल, टॅब खरेदीकडे असल्याचे दिसत आहे.