एकाचा बळी, ३३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:20+5:302021-02-06T05:03:20+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ५३६ जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ५०३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ३३ जणांचा अहवाल ...

एकाचा बळी, ३३ नवे रुग्ण
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ५३६ जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ५०३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ३, आष्टी २, बीड २१, धारूर, गेवराई, वडवणी तालुक्यात प्रत्येकी १ तर केज व परळी तालुक्यातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. तसेच बीड शहरातील अंकुशनगर भागातील ७६ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १७ हजार ९८३ झाली आहे. पैकी १७ हजार २१५ जण कोरोनामुक्त झाले असून ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख १ हजार ६०८ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील १ लाख ८३ हजार ६२५ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी ही माहिती दिली.