कारच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:36+5:302021-06-17T04:23:36+5:30
गेवराई : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ...

कारच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार, एक जखमी
गेवराई : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गढीजवळील वडगाव फाट्यावर घडली.
अर्जुन महादेव शेंद्रे (वय ४५, रा. रांजणी) असे मृताचे नाव असून बाबासाहेब नामदेव शिंदे (३३, रा. शिंदेवाडी) असे जखमीचे नाव आहे. हे दोघे बुधवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीने (एमएच २३, सीएल ९८९०) रांजणीकडे जात होते. दरम्यान, गढीजवळच्या वडगाव फाट्यावर बीडकडून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच २३ एडी ४६१८) दुचाकीला जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातात अर्जुन शेंद्रे हे जागीच ठार झाले. जखमी बाबासाहेब शिंदे यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
===Photopath===
160621\sakharam shinde_img-20210616-wa0037_14.jpg~160621\sakharam shinde_img-20210616-wa0035_14.jpg