शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना कार दरीत कोसळली; शिक्षक पतीचा मृत्यू, पत्नी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 10:33 IST

समोरील गाडीने हुल दिल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला

- नितीन कांबळे कडा ( बीड) - नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना अज्ञात वाहनाने हुल दिल्याने चालकाचा ताबा सुटुन कार दरीत कोसळुन झालेल्या अपघातात शिक्षक पतीचा जागीच मृत्यू झाला.  तर पत्नी जखमी झाल्याची घटना बीडसांगवी येथील महादेव दरा येथील घाटात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. अंबादास पांडुरंग उगले असे मयत शिक्षकांचे नाव आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील थेटे सांगवी येथील उगले हे गेवराई येथील एका शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करतात. तर त्यांची पत्नी आणि मुले लातूर येथे असतात. कडा येथील एका नातेवाईकांच्या अंत्यविधी असल्याने उगले हे कारने ( क्रमांक एम.एच २३,ए.डी.०२४९) आज सकाळी गेवराईवरून निघाले. तर पत्नी लातूरवरून सावरगाव घाटपर्यंत सहकाऱ्यांच्या गाडीत आली होती. 

शिक्षक उगले यांनी पत्नीला सावरगाव घाट येथून सोबत घेत कारमधून निघाले. दरम्यान, बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात अज्ञात वाहनाने हुल दिल्याने ताबा सुटुन कार खोल दरीत कोसळली. यात अंबादास पांडुरंग उगले यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सगुना या जखमी झाल्या.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड