शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

थकित ऊस बिलासाठी माजलगावात अधिकाऱ्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:24 IST

माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर अधिका-यांना पोलीस ठाण्यात आणले.पवारवाडी येथील जय महेश या खाजगी साखर कारखान्याने मागील वर्षी ...

माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर अधिका-यांना पोलीस ठाण्यात आणले.

पवारवाडी येथील जय महेश या खाजगी साखर कारखान्याने मागील वर्षी आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. गाळप हंगाम संपून आठ महिने झाले असताना अद्यापही कारखाना प्रशासनाने मात्र गाळपासाठी आणलेल्या शेतकºयांच्या उसाचे अद्यापही दिले नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

थकीत पैशांसाठी शेतक-यांनी अनेकवेळा खेटे मारले, साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या तरीही शेतकºयांना ऊसाचे पैसे भेटले नाहीत. यामुळे सोमवारी काही शेतकºयांनी कारखाना गेटसमोर आंदोलन केले. यावेळी वडवणी तालुक्यातील देवगाव येथील बाबू भागूजी गवळी (वय ५८) यांनी सोबत आणलेले विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात बाजूच्या शेतकºयांनी त्यांना रोखून आत्महत्येपासून परावृत्त केले.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी थेट कारखान्याच्या कार्यालयात जाऊन शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचाºयांना त्यांच्या खोलीत कोंडून ठेवले. दोन तासानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा बेग, पोलीस उप निरीक्षक विकास दांडे, शिवसेनेचे अप्पासाहेब जाधव यांनी हस्तक्षेप करून शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचारी, शेतकरी यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले.पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनशेतकºयांचे थकीत बिल देण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली, लेखी निवेदने दिली; परंतु कारखान्याच्या अधिका-यांनी साखर आयुक्तांपर्यंत सर्वांनाच ‘मॅनेज’ केले. बिल थकल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. आता दोन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- अप्पासाहेब जाधवशिवसेना नेते

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा