बीडला अनाधिकृत बॅनर लावणा-या काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:40 IST2018-02-16T23:40:22+5:302018-02-16T23:40:27+5:30
बीड : शहरातील नगर रोड परिसरात दुभाजकावर अनाधिकृत बॅनर लावणा-या काँग्रेस कार्यकर्त्यावर गुरुवारी शिवाजीगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...

बीडला अनाधिकृत बॅनर लावणा-या काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा
बीड : शहरातील नगर रोड परिसरात दुभाजकावर अनाधिकृत बॅनर लावणा-या काँग्रेस कार्यकर्त्यावर गुरुवारी शिवाजीगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्या बॅनरवरुन कारवाई झाली त्यावर काँगे्रस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो होते, असे सूत्रांनी सांगितले.
अक्षय चांदणे असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. नगरपालिकेच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षक या कर्मचाºयांसमवेत नगर रोड परिसरात स्वच्छता करीत होत्या. याचवेळी मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर काँगे्रस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो असलेले अनाधिकृत बॅनर त्यांना आढळले. ही माहिती त्यांनी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना दिली. त्यांच्याकडून आदेश मिळताच निरीक्षकांनी बॅनर काढण्यास सुरुवात केली. याचवेळी अक्षय चांदणे हा तिथे आला आणि बॅनर काढताना अडथळा आणला. त्यावरुन हे बॅनर त्यानेच लावल्याचे सिद्ध झाले असे समजून त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.