बेघर व भोगवटादारांना घरे बांधण्यासाठी ताबा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:21+5:302021-06-03T04:24:21+5:30

माजलगाव नगरपरिषदेच्या आरक्षित जागा सर्वे नं.३७१,३७२,३७३ हे असून, ती जागा आपल्या नगरपालिकेने ताब्यात घेऊन भोगवटादार व बेघर नागरिकांना ...

Occupancy movement to build houses for the homeless and occupants | बेघर व भोगवटादारांना घरे बांधण्यासाठी ताबा आंदोलन

बेघर व भोगवटादारांना घरे बांधण्यासाठी ताबा आंदोलन

माजलगाव नगरपरिषदेच्या आरक्षित जागा सर्वे नं.३७१,३७२,३७३ हे असून, ती जागा आपल्या नगरपालिकेने ताब्यात घेऊन भोगवटादार व बेघर नागरिकांना प्लॉट पाडून वाटप करावे, या अनुषंगाने नगरपालिकेकडे अनेक वेळा निवेदन दिले होते. मात्र, नगरपालिकेने या निवेदनाला केराचा टोपली दाखविली होती. कार्यालयाने आजपर्यंत या प्रकरणी कोणतेही कारवाई केली नसल्याने, गरीब व बेघर कुटुंब आजही वंचित आहेत. त्यामुळे सदरील जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले व करत आहेत.

या जागेवरील अतिक्रमण काढून वरील जागा खुली करण्यात यावी. यातील काही शिल्लक जागा आठवडी बाजारास कायमस्वरूपी द्यावी, या व इतर मागण्यांसाठी लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांनी सदरील जागेच्या ठिकाणी २ जून रोजी आंदोलन सुरू केले होते.

येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

===Photopath===

020621\purusttam karva_img-20210602-wa0042_14.jpg

Web Title: Occupancy movement to build houses for the homeless and occupants