वाहनांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:52+5:302021-01-08T05:46:52+5:30

निर्जंतुकीकरण होईना अंबाजोगाई : एसटी. महामंडळाच्या बसेस सॅनिटायझेशन करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. ...

Obstruction by vehicles | वाहनांमुळे अडथळा

वाहनांमुळे अडथळा

निर्जंतुकीकरण होईना

अंबाजोगाई : एसटी. महामंडळाच्या बसेस सॅनिटायझेशन करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. बसेससोबत चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहाचेही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना असतानाही सावधगिरी दिसेनासी झाली आहे.

सायबर गुन्ह्यांत वाढ

अंबाजोगाई : तालुक्यात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तुम्हाला बक्षीस लागले असे मेसेज करून नागरिकांना भुलवले जाते. पुन्हा तुमच्या बँकेच्या खात्यातून या क्रमांकावर टॅक्सची इतकी रक्कम भरा. तुम्हाला मोठी रक्कम तत्काळ उपलब्ध होईल अशा क्लृप्त्या लढवत नागरिकांना गंडविले जात आहे.

भाजीपाला स्वस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या बाजारपेठेत गेल्या दोन आठवड्यांपासून भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातून पत्ता कोबी, फूलकोबी, वांगी, टोमॅटो, पालक, मेथी, सिमला मिरची, लिंबू, कोथिंबीर अशा विविध भाज्या मोठ्या प्रमाणावर येत असल्याने स्वस्त झाल्या आहेत.

वाहनतळाचा अभाव

अंबाजोगाई : शहरातील भाजीमंडईमध्ये वाहनतळाचा अभाव आहे. मंडीबाजार व भाजीमंडी परिसर ग्राहकांमुळे सतत गजबजलेला असतो. अरुंद रस्ते व वाहनतळाचा अभाव यामुळे या परिसरात सतत वाहतुकीची कोंडी होते. मंडीबाजारात वाहनतळाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

अपुरे कर्मचारी

अंबाजोगाई : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना पुरेशा सुविधा देण्यासाठी पालिकेकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. परिणामी शहरातील विविध भागात नागरी समस्या वाढत आहेत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर कामे करण्याचे आदेश द्यावेत व तत्काळ उपायांची मागणी आहे.

रब्बी हंगामातील पिके बहरू लागली

बीड : जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पिकांना पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. अतिवृष्टीने खरिपाची पिके तर शेतकऱ्यांची हातून गेली. मात्र त्यानंतर गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके पाण्याची उपलब्धता असल्याने जोमात येऊ लागले आहेत. त्यामुळे या पिकांतून तरी उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

Web Title: Obstruction by vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.