ओबीसी जनमोर्चाची परळीत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:07+5:302021-06-25T04:24:07+5:30

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, पदोन्नती, मेगा भरती करावी, ओबीसींची अनुशेष भरती करावी, ...

OBC Janamorcha protests in Parli | ओबीसी जनमोर्चाची परळीत निदर्शने

ओबीसी जनमोर्चाची परळीत निदर्शने

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, पदोन्नती, मेगा भरती करावी, ओबीसींची अनुशेष भरती करावी, जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या निदर्शनात महिलांच्या लाक्षणिक सहभागासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात ओबीसी बांधवांनी आपल्या एकीची वज्रमूठ दाखवली. ओबीसी समाजातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी नेते. प्रा. टी. पी. मुंडे प्रा. नरहरी काकडे, रिपाईचे भास्कर नाना रोडे .विलास ताटे, भीमराव सातपुते ,भीमराव मुंडे ,.बाबासाहेब काळे ,.माऊली बिडगर,आत्माराम कराड , सूर्यकांत मुंडे , काशिनाथ राठोड ,

.विनायक गडदे, संतराम गडदे ,रवींद्र गीते , जयश्री मुंडे- गीते, नूरबानू खाल्ला,विश्वनाथ देवकर, नवनाथ क्षीरसागर , श्याम गडेकर, सुंदर मुंडे, जि प सदस्य प्रदीप मुंडे , प्राचार्य बी. डी. मुंडे, किशोर जाधव आदीसह ओबीसी समाजात काम करणारे विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संपूर्ण राज्यात ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने रद्द केले त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे ओबीसीसह बलुतेदार व इतर ओबीसीत समाविष्ट असणाऱ्या समाजाचा अंत महाविकास आघाडी सरकारने पाहू नये असा इशारा ओबीसी नेते प्रा. टी. पी. मुंडे( सर) यांनी दिला महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य निदर्शनात ते बोलत होते

===Photopath===

240621\24_2_bed_10_24062021_14.jpg~240621\24_2_bed_9_24062021_14.jpg

===Caption===

परळीत ओबीसी जनमोर्चाची निदर्शने~परळीत ओबीसी जनमोर्चाची निदर्शने

Web Title: OBC Janamorcha protests in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.