ओबीसींचे आक्रोश आंदोलन; घोषणांनी शिरूर दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:44+5:302021-06-27T04:21:44+5:30
आरक्षण संपुष्टात आणणे म्हणजे हा ओबीसी समाजाचा राजकीय बळी आहे. तरी आरक्षण कायम ठेवा, या मागणीसाठी राज्यभर भाजप नेत्या ...

ओबीसींचे आक्रोश आंदोलन; घोषणांनी शिरूर दणाणले
आरक्षण संपुष्टात आणणे म्हणजे हा ओबीसी समाजाचा राजकीय बळी आहे. तरी आरक्षण कायम ठेवा, या मागणीसाठी राज्यभर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आंदोलन पुकारले होते. त्याला प्रतिसाद देत शिरूरमध्येही आंदोलन छेडले गेले. आमदार पुत्र सागर धस यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुसुदन खेडकर यांच्यासह ज्येष्ठ नेते दशरथ वणवे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार, रामराव खेडकर, रामदास बडे, बाबुराव केदार, चंपाकाकी पानसंबळ, भाग्यश्री ढाकणे, एम. एन. बडे, नगराध्यक्ष रोहिदास पाटील, दत्ता पाटील, प्रकाश खेडकर, आरपीआयचे अरूण भालेराव, फय्याजभाई शेख, नगरसेविका वर्षा सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सुरेश उगलमुगले यांनी केले.
तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी निवेदन स्वीकारले. तर पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. रामचंद्र पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात घोगस पारगावचे सरपंच देवा गर्कळ, दादा हरिदास, बाजीराव सानप, कल्याण तांबे, सावळेराम जायभाये, किशोर खोले, संतोष भांडेकर यांची उपस्थिती होती.
===Photopath===
260621\img20210626103805.jpg
===Caption===
शिरूरकासार येथे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने जिजामाता चौकात चक्काजाम आंदोलन केले.