बाधितांनी ओलांडला २२ हजारांचा आकडा; मृत्यूही ६००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:40+5:302021-03-21T04:32:40+5:30

बीड : कोरोनाबाधितांचा वाढत जाणारा आकडा जिल्ह्यासाठी चिंताजनक ठरत आहे. शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवे २६५ रुग्ण निष्पन्न झाले, ...

The number of victims exceeded 22,000; 600 deaths | बाधितांनी ओलांडला २२ हजारांचा आकडा; मृत्यूही ६००

बाधितांनी ओलांडला २२ हजारांचा आकडा; मृत्यूही ६००

बीड : कोरोनाबाधितांचा वाढत जाणारा आकडा जिल्ह्यासाठी चिंताजनक ठरत आहे. शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवे २६५ रुग्ण निष्पन्न झाले, तर दोघांचा मृत्यू झाला. सध्या एकूण बाधितांचा आकडा २२ हजार पार गेला आहे, तर मृत्यूही ६०० झाले आहेत. तसेच शनिवारी १५५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात शुक्रवारी १७९९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यातील १५३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर २६५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई ८५, आष्टी १४, बीड १०८, धारूर ५, गेवराई ९ केज ८, माजलगाव ११, परळी १२, पाटोदा ६, शिरूर २ व वडवणी तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात माळीवेस बीड येथील ७६ वर्षीय पुरुष व गेवराई येथील टिचर्स कॉलनीतील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान, १५५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शनिवारच्या बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १०८, तर अंबाजोगाई शहरात तब्बल ८५ रुग्णांचा समावेश आहे. बीड तालुक्यातील केवळ ४, तर शहरातील १०४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अशीच स्थिती अंबाजोगाई शहराची आहे. आता एकूण बाधितांचा आकडा २२ हजार १७ इतका झाला आहे. यापैकी २० हजार २२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ६०० रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

चाचण्यांचा प्रतिसाद वाढला

कोरोना चाचण्या बंधनकारक करण्यासह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढली आहे. त्यामुळे लोक चाचणी करण्यासाठी रांगा लावू लागले आहेत. जिल्हा रुग्णालय आणि आयटीआयी कोविड केअर सेंटरमध्ये चाचण्या करणाऱ्यांचा प्रतिसाद दिसून आला.

---

अशी आहे आकडेवारी

एकूण काेरोनाबाधित २२०१७

एकूण कोरोनामुक्त २०२२२

एकूण मृत्यू ६००

पॉझिटिव्हिटी रेट १३.१ टक्के

डेथ रेट २.७२ टक्के

डबलिंग रेट ३३२.२ टक्के

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेषो प्रति रुग्ण २०.२२ टक्के

कॉन्टॅक्ट ट्रेसड ४४५१९३

रिकव्हरी रेट ९१.८४

===Photopath===

200321\202_bed_12_20032021_14.jpeg

===Caption===

जिल्हा रूग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी लागलेल्या रांगा.

Web Title: The number of victims exceeded 22,000; 600 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.