भुरट्या चोरांचा वावर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:52+5:302021-01-10T04:25:52+5:30
वाळू उपशावर नियंत्रणाची मागणी माजलगाव: तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...

भुरट्या चोरांचा वावर वाढला
वाळू उपशावर नियंत्रणाची मागणी
माजलगाव: तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी होत आहे.
रस्त्यावर खड्डे;
दुरुस्तीची मागणी
बीड : शहरातील आदर्शनगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा आकार वाढत आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त आहेत. दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भाजी मंडईतील कोंडी हटेना
बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविववारी आठवडी बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
बसस्थानकाचे काम गतीने करावे
बीड : बीड बसस्थानक, आगाराचे बांधकाम सध्या केले जात आहे; परंतु लॉकडाउनमुळे हे काम बंद पडले होते. आता बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. सध्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.