माजलगाव शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST2021-03-23T04:35:30+5:302021-03-23T04:35:30+5:30
माजलगाव : शहरात दिवसेंदिवस विनामास्क बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत असून विनामास्क ग्राहक करण्यात दुकानदार मग्न असताना ...

माजलगाव शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली
माजलगाव : शहरात दिवसेंदिवस विनामास्क बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत असून विनामास्क ग्राहक करण्यात दुकानदार मग्न असताना याकडे मात्र पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. तर, दुसरीकडे न.प. कर्मचाऱ्यांकडून मागील आठ दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या एकाही व्यक्तीवर कारवाई झाली नाही.
माजलगाव शहर व परिसरात मागील १५ दिवसांपासून माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण येत आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घेत वारंवार हात धुणे, सतत मास्क लावून फिरणे, इतर लोकांचा संपर्क टाळणे, बाहेरून आणलेल्या वस्तू धुणे हे करत होते. त्याचदरम्यान नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड करण्यास सुरुवात केली होती. दंड न भरणाऱ्यांना उठकबैठक करण्याची शिक्षाही दिली जात असे. परंतु, मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रुग्ण निघत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी केवळ तीन-चार दिवस कारवाया केल्या. तर तहसीलदारांनी एक दिवस अर्धा तास चौकात उभा राहून कारवाई केली. मागील ८-१० दिवसांत विनामास्क फिरणाऱ्यांवर एकदाही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त विनामास्क फिरताना दिसत आहेत.
सध्या तालुक्यात ८० टक्के नागरिक हे विनामास्क फिरत असून एकमेकांच्या संपर्कात बिनधास्त येत आहेत. तर काही दुकानदार, भाजीपाला व फळविक्रेते विनामास्क व विनाग्लोव्हज व्यवहार करणा-यांकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढायला वेळ लागणार नाही. नागरिकांनी विनामास्क फिरणे धोकादायक असून सर्वांनी मास्क लावूनच बाहेर फिरायला हवे व एकमेकांचा संपर्क टाळल्यास कोरोनापासून आपण बचाव करू शकतो. - डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी
आम्हीच जास्त दंड वसूल केला
मागील एक महिन्यात नगरपालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया करत दंड वसूल केला. सध्या आमचे कर्मचारी ज्या दुकानदारांनी कोरोना चाचणी केली नाही, त्यांची विचारणा करत आहेत. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाया थांबवल्या आहेत.
--- विशाल भोसले, मुख्याधिकारी, न.प. माजलगाव
विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिकेने कारवाई करणे आवश्यक आहे. कारवाया थांबवल्या असतील तर नगरपालिकेला कळवण्यात येईल. त्यांना कारवाया करण्याबाबत सांगण्यात येईल.
--- वैशाली पाटील, तहसीलदार
===Photopath===
220321\purusttam karva_img-20210322-wa0022_14.jpg~220321\purusttam karva_img-20210322-wa0018_14.jpg