कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांचा आकडा वाढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:17+5:302021-06-25T04:24:17+5:30
बीड : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत नव्या रुग्णांचा आकडा वाढला आहे, तर दरम्यान २४ तासात कोरोनामुळे चार ...

कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांचा आकडा वाढताच
बीड : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत नव्या रुग्णांचा आकडा वाढला आहे, तर दरम्यान २४ तासात कोरोनामुळे चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. नवे १५१ रुग्ण निष्पन्न झाले, तर १०३ जणांनी कोरोनावर मात केली.
बुधवारी घेतलेल्या ४ हजार ६६ संशयितांच्या कोरोना चाचणीचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात १५१ नमुने पॉझिटिव्ह, तर ३९१५ नमु्न्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधितांमध्ये अंबाजोगाई १, आष्टी २५, बीड २५, धारुर १२, गेवराई २१, केज २८, माजलगाव ११, परळी ५, पाटोदा १०, शिरुर ६ व वडवणी तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा ९१ हजार ९१ इतका झाला असून यापैकी ८७ हजार ३७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात लिंबारुई (ता. बीड) येथील ३५ वर्षीय महिला, केज शहरातील ७५ वर्षीय महिला, लाडझरी (ता. अंबाजोगाई) येथील ८६ वर्षीय पुरुष व गवळवाडी (ता. पाटोदा) येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता एकूण बळींचा आकडा दोन हजार ४६७ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-------