धारूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:24+5:302021-06-03T04:24:24+5:30
.... बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी धारूर : तालुक्यात शेतकरी शेतीची मशागतीची कामे पूर्ण करून बी-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. ...

धारूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली
....
बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
धारूर : तालुक्यात शेतकरी शेतीची मशागतीची कामे पूर्ण करून बी-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. सोयाबीन पेरणी यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणार असे चिन्ह दिसून येत आहेत. तर कापूस उत्पादनामध्ये मात्र घट होणार अशी परिस्थिती दिसून येत आहे.
....
घरगुती लोणच्यासाठी आंब्याला मागणी
धारूर : बाजारात मिळणाऱ्या लोणच्यापेक्षा घरगुती लोणच्याची चव भारीच असते. यामुळे घरगुती लोणचे घालण्यासाठी ग्रामीण भागात महिलांची लगबग सुरू आहे. यासाठी आंब्याची मागणी वाढली आहे.
....
शेख रज्जाक यांच्या कुटुंबाचे मुंडे भगिनींकडून सांत्वन
धारूर : तालुक्यातील हिंगणी ब्रुद्रूक येथील माजी उपसरपंच, भाजपाचे कार्यकर्ते शेख रज्जाक यांचे नुकतेच अकाली निधन झाले. माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांनी शेख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखातून सावरण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे मुंडे भगिनींनी कुटुंबीयांना सांगितले.
....