बीडच्या रापमकडून आता पॅकेज टूर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:56+5:302021-01-08T05:47:56+5:30
बीड विभागातील बीड आगाराकडून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी अष्टविनायक दर्शन, वेरूळ, घृष्णेश्वर दर्शन, महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष दर्शन बससेवा सुरू ...

बीडच्या रापमकडून आता पॅकेज टूर्स
बीड विभागातील बीड आगाराकडून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी अष्टविनायक दर्शन, वेरूळ, घृष्णेश्वर दर्शन, महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष दर्शन बससेवा सुरू करण्यात येत आहे. सदर बसेस आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. बीड-खुलताबाद-वेरूळ-घृष्णेश्वर दर्शन यासाठी प्रति प्रवासी ४५० रूपये तर अर्धे तिकीट म्हणून २२५ रूपये दर असणार आहे. बीड ते अष्टविनायक दर्शनासाठी प्रति व्यक्ती १२१० तर अर्धे तिकीट ६०५ रूपये प्रमाणे तिकीट दर असणार आहे. अंबाजोगाई येथून अक्कलकोट दर्शनासाठी (वेळ सकाळी ८ ते रात्री ८ ) प्रति प्रवासी ५८० रूपये तर अर्धे तिकीट २९० रूपये याप्रमाणे तिकीट दर असणार आहे. प्रवाशांनी बीडमध्ये आगारप्रमुख निलेश पवार तर अंबाजाेगाईत आगारप्रमुख चौरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जगनोर यांनी केले आहे.