शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.., पंकजा मुंडेंचा संताप

By महेश गलांडे | Updated: October 27, 2020 10:33 IST

जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा  हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती.

ठळक मुद्देजिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा  हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती.

बीड - जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मेळावा घेतल्याबद्दल माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह तीन आमदार, खासदार व इतर ५० अशा एकूण ५५ जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन संताप व्यक्त केला आहे. पंकजा यांनी सावरगाव घाट येथे काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेतला. यावेळी, विविध मुद्द्यांवर भाष्य करताना, पालकमंत्री धनंजय मुंडेंवरही अप्रत्यक्षपणे टीका केली होती. मात्र, या मेळाव्यानंतर त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री आ. महादेव जानकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर ‌व इतर ५० जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन नीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

सावरगाव येथील दसरा मेळाव्यात सोशल डिस्टन्स पाळले नाही, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आणि जमावबंदी असतानाही माणसांची गर्दी जमा केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर... असे म्हणत पंकजा यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, पाहणी दौऱ्यावेळी अनेक नेत्यांनी जिल्ह्यात दौरे केले, त्यांच्यावर कुठलिही कारवाई नसल्याचे सूचवत, आपण परवानगी घेऊन मेळाव्याला गेल्यावरही गुन्हा दाखल केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या