आता मला भिमसेन म्हणा; भिमराव धोंडेंनी बदलले नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:06+5:302021-03-13T04:59:06+5:30
आष्टी : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या आदेशाने मी भिमराव ऐवजी भिमसेन असे नामकरण केले असल्याचे ...

आता मला भिमसेन म्हणा; भिमराव धोंडेंनी बदलले नाव
आष्टी : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या आदेशाने मी भिमराव ऐवजी भिमसेन असे नामकरण केले असल्याचे माजी आ. भिमराव आनंदराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आष्टी येथील भगवान महाविद्यालयात ११ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, जानेवारी महिन्यामध्ये गहिनीनाथ गडावर राष्ट्रसंत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राजकीय पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात समाजाच्या उपस्थितीत महंत विठ्ठल महाराज यांच्या वाणीतून भिमराव ऐवजी भिमसेन असे आले होते. त्यानंतर मी याबाबत विहित नमुन्यातील प्रस्ताव नाव, वय आणि धर्म बदलण्याच्या कार्यालयात दाखल केला. त्यानुसार या कार्यालयाने ४ मार्च २१ रोजी राजपत्र (गॅजेट) प्रसिद्ध केले. आता यापुढे मला भिमराव ऐवजी भिमसेन म्हणून नाव संबोधित करावे, असेही धोंडे यांनी सांगितले.