रमेश मुळे यांच्या कार्याची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST2021-06-16T04:44:36+5:302021-06-16T04:44:36+5:30

बीड : मुळे अण्णा सोशल फाउंडेशन औरंगाबाद यांच्यावतीने कोरोना काळात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात गोरगरीब, दीनदुबळ्या व गरजूंना अन्नधान्यासह ...

Notice of Ramesh Mule's work | रमेश मुळे यांच्या कार्याची दखल

रमेश मुळे यांच्या कार्याची दखल

बीड : मुळे अण्णा सोशल फाउंडेशन औरंगाबाद यांच्यावतीने कोरोना काळात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात गोरगरीब, दीनदुबळ्या व गरजूंना अन्नधान्यासह इतर दैनंदिन जीवनावश्यक लागणाऱ्या साहित्याची मदत करण्यात आली. या कार्याची दखल घेऊन शरद पवार यांनी फाउंडेशनचे रमेश मुळे यांचा सोमवारी बारामती येथील निवासस्थानावर विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मान केला आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

मुळे यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देश या जिल्ह्यातील गोरगरीब गरजूंना अन्नधान्य तसेच पोलिसांना मास्क, सॅनिटायझर, चहा, नाष्टा, जेवण व काही पोलीस ठाण्यांना लोखंडी गेट, जिल्हा परिषद शाळांच्या डागडुजीसाठी मदत केली. त्यांच्या सेवाभावी कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा देताना हे कार्य असेच अखंड चालू राहू देत, असे मार्गदर्शनही शरद पवार यांनी केले.

===Photopath===

140621\14bed_27_14062021_14.jpg

===Caption===

रमेश मुळे 

Web Title: Notice of Ramesh Mule's work