आमच्या स्वप्नात नव्हतं पण त्याच्या मेहनतीचं मोलं हाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:08+5:302020-12-30T04:43:08+5:30
नितीन कांबळे कडा : (जि.बीड) आम्ही अडाणी, आमचा शिक्षणाचा कुठं बी संपर्क आला नाही. लागेलं तिथ मोलमजुरी करून कुटुंबाचा ...

आमच्या स्वप्नात नव्हतं पण त्याच्या मेहनतीचं मोलं हाय
नितीन कांबळे
कडा : (जि.बीड) आम्ही अडाणी, आमचा शिक्षणाचा कुठं बी संपर्क आला नाही. लागेलं तिथ मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढायचा. कामाशिवाय दुसर काहीच माहिती नाही आणि आमच्या कष्टाचं चीज करून पोरांन लयी मोठी कामगिरी केली आहे. असा सोन्याचा दिवस येई, अस आमच्या स्वप्नातही नव्हत पण त्यांनी मेहनतीचं मोलं केलं, अशी प्रतिक्रिया अविनाश साबळेच्या आई-वडिलांनी ‘लोकमत’ला दिली.
आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे सध्या टोकियो २०२१ ऑलंपिकसाठी तयारी करत आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारने नुकतेच त्याला पन्नास लाख रुपयांची मदत केली आहे. याच अनुषंगाने अविनाश यांच्या मुळ गावी जाऊन लोकमतने घेतलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.
आष्टी तालुक्यातील मांडवा येथील मुकुंद साहेबराव साबळे यांचा अविनाश हा थोरला मुलगा अविनाश. लहानपणापासून त्याला शर्यतीची आवड होती. शाळेत, गावात, परिसरात तो नेहमीच पळायचा मग यातुनच आवड निर्माण होत गेली मग त्याचं प्राथमिक शिक्षण गावात मांडवा जि.प. शाळेत, नंतर लोणी प्रवरा, औरंगाबाद, पुणे येथेही शिक्षण झाले. मग यातुनच धावण्याच्या स्पर्धत सहभागी होऊन त्याने त्यांच्या जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांने कामाला सुरुवात केली आहे. आज तो देशाचे नेतृत्व करण्यासाठी ऑलिम्पिकसाठी सराव करत आहे. लहान वयात मनाशी बांधलेली स्वप्न त्याने साकार केली आहेत . आमच्या स्वप्नात नव्हत पण त्यांनी मेहनतीचं मोलं केलं आणि आज तो देशासाठी खेळतो सहभाग घेतो हे आमचे भाग्य असल्याचे वडिल मुकुंद साबळे यांनी लोकमतला सांगितले
●माझ्या अविनाश ने आजवर देशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके जिंकली आहेत. एवढचं काय तर आम्हाला वाटलं नाही कधी आपल पोरंग देशाच्या ठिकाणी असेल त्याची लहानपणापासुनची धडपड ख-र्या अर्थाने फळाला आल्याचे समाधान झाले. यापुढे तो आणखी मोठा व्हावा अशी अपेक्षा आई वैशाली साबळे यांनी सांगितले.
अविनाश हा टोकियो २१ ऑलंपिक स्पर्धेतील तीन कि.मी.च्या अडथळ्याच्या क्रिडा प्रकारासाठी पात्र ठरला असून सुवर्णपदक जिकंण्यासाठी मेहनत घेत आहे. ५००० कि.मी. धावण्याच्या शर्यतीत त्यांने राष्ट्रीय विक्रम केला आहेे. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या सैन्यदलात भरती व्हावे लागले होते.