स्वच्छता होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:31+5:302021-03-14T04:29:31+5:30
अतिक्रमणाने कोंडी गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे ...

स्वच्छता होईना
अतिक्रमणाने कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या हातगाडे चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. या चोरींना आळा घालण्याची मागणी आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.
कडबा चारा कमी
अंबाजोगाई : तालुक्यात उसाची लागवड व हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्वारीचे पीक लावल्यानंतर ज्वारी सांभाळणे जिकरीचे काम आहे. यामुळे कडबा यंदा मिळणे दुरापास्त झाले आहे.