अवाजवी वीज बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:38+5:302021-07-12T04:21:38+5:30
घंटागाडी येईना अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहत ...

अवाजवी वीज बिले
घंटागाडी येईना
अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहत आहे. गाडी नियमित व वेळेवर सोडून जागोगाजी स्वच्छतेची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खोलीकरण गरजेचे
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगांव या परिसरात असणाऱ्या पाझर तलावाचे खोलीकरण करावे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी या परिसरातील तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी होत आहे.
अंमलबजावणी होईना
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
गॅसचा गैरवापर
बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते.