अवाजवी वीजबिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:17+5:302021-07-21T04:23:17+5:30
स्वच्छता होईना बीड : शहरातील विविध भागांत घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार ...

अवाजवी वीजबिले
स्वच्छता होईना
बीड : शहरातील विविध भागांत घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून, नगरपरिषदेने यंत्रणेमार्फत स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
सुट्ट्या पैशांची टंचाई
बीड : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात नाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे.
रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागांतील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. या चोरींना आळा घालण्याची मागणी आहे.
अतिक्रमणाने कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या हातगाडे चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.