ना दिशादर्शक, ना धोकादायक फलक; सा.बां.चे दुर्लक्ष, अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:48+5:302021-07-08T04:22:48+5:30

वरिष्ठ अधिकारी यांनी यांकडे लक्ष देऊन होणारे अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक व धोकादायक वळणावर फलक बसवावेत, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन ...

No signposts, no danger panels; Sa.B.'s negligence, accidents increased | ना दिशादर्शक, ना धोकादायक फलक; सा.बां.चे दुर्लक्ष, अपघात वाढले

ना दिशादर्शक, ना धोकादायक फलक; सा.बां.चे दुर्लक्ष, अपघात वाढले

वरिष्ठ अधिकारी यांनी यांकडे लक्ष देऊन होणारे अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक व धोकादायक वळणावर फलक बसवावेत, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष दीपक गरूड यांनी केली आहे.

बीड-धामणगाव-नगर हा राज्य महामार्ग तर बीड आष्टी नगर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. दोनही रोडने मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असून, कायम वर्दळ असते. वास्तविक पाहता या दोनही रोडने संबंधित विभागाने दिशादर्शक, धोकादायक, अवघड वळण, संरक्षण भिंत, पुढे गाव आहे, असे फलक लावणे गरजेचे असताना या दोन्ही रोडवर कुठेच फलक लावलेले नसल्याने दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन अनेक जणांना जखमी तर काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. एवढे होऊनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष का आहे? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन हा प्रश्न सोडवून जागोजागी हे फलक लावून त्यावर तसा नामोल्लेख करावा, अशी मागणी केली जात आहे.

धोकादायक ठिकाणे

वाघळुज, धानोरा, म्हसोबावाडी, बीडसांगवी, कडा या ठिकाणी कायम अपघात

आजवर घडले आहेत. वाघळुज धानोरा, म्हसोबावाडी, बीडसांगवी या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणावर अनेक अपघात घडले आहेत. एवढेच काय तर धानोरा येथील वळणावर दहा जणांचा बळी गेला होता. तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे.

पुलाचे लोखंडी पाइप गायब

या दोन्ही रस्त्यांवर असलेल्या मोठे, लहान पूल आहेत. याच पुलांना संरक्षण म्हणून लोखंडी पाइप लावले होते; पण अनेक वर्षांपासून पुलाचे लोखंडी पाइप गायब झाले असूनदेखील संबंधित विभागाने याची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही.

आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. पी. जोरवेकर यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतला नसल्याने त्यांची बाजू घेता आली नाही.

070721\20210629_101021_14.jpg

Web Title: No signposts, no danger panels; Sa.B.'s negligence, accidents increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.