ना शाळा, ना परीक्षा; ५ लाख ८६ हजार विद्यार्थी पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:20+5:302021-06-23T04:22:20+5:30
-------- ऑनलाइन शिक्षणाचे फायदे विद्यार्थ्यांना शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या मोबाइल, लॅपटॉपवरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी कोचिंगसाठी ...

ना शाळा, ना परीक्षा; ५ लाख ८६ हजार विद्यार्थी पास!
--------
ऑनलाइन शिक्षणाचे फायदे
विद्यार्थ्यांना शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या मोबाइल, लॅपटॉपवरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी कोचिंगसाठी घराबाहेर न जाता, घरीच राहून निश्चिंतपणे शिक्षण घेत आहेत. पण त्याचे प्रमाण कमी आहे. या शिक्षणामुळे दूर शाळा असणाऱ्या विद्यार्थ्याला लागणारा प्रवास खर्च आणि वेळ वाचतो. ऑनलाइन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून लेक्चर करू शकतो. ऑनलाइन शिक्षणात वेळ आणि पैशांची बचत होते.
ऑनलाइन शिक्षणाचे तोटे
मोबाइल, लॅपटॉपसमोर तासंतास बसावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास झाल्याचे दिसून आले आहे. डोकेदुखी, डोळ्यांत जळजळ होणे, थकणे आदी शारीरिक समस्यांबरोबरच मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढल्याचे बालरोगतज्ज्ञांच्या निदर्शनास आलेले आहे. मुलांना व्यावहारिक अनुभव, निरीक्षण आणि प्रात्यक्षिकांचा ऑनलाइन शिक्षणात अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होत नाही तसेच शिस्तीचे तर नावच नाही.
ग्रामीण भागात
जिल्ह्यातील अनेक गावांत इंटरनेट उपलब्ध नाही. जेथे इंटरनेट आहे तेथे त्याची गुणवत्ता फार चांगली नाही. ऑनलाइन शिक्षणासाठी योग्य नेटवर्कची आवश्यकता असते. ग्रामीण भागात नेटवर्क सुरळीत नसल्याने व्हिडिओ थांबणे, आवाज ऐकू न येणे किंवा व्हिडिओ अडकणे, ‘एरर’सारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाइल, कॉम्प्युटर व लॅपटॉपचा अभाव प्रामुख्याने जाणवला. ६५ टक्के मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकलेली नसल्याचे ग्रामीण भागातील शिक्षकांचे म्हणणे आहे.
शहरी भागात
ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी काय करीत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. ज्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होतात. घरातच असल्याने ऑनलाइन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाइल, कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप शहरी मुलांना पालकांच्या सधनतेवरच उपलब्ध होऊ शकतात. कोरोनामुळे अनेक पालक एक वर्षापासून अडचणीत आहेत. विविध कारणांमुळे ५० टक्के मुले ऑनलाइनपासून दूरच राहिल्याचे निरीक्षण शहरातील शिक्षकांनी नोंदविले आहे.
------------
जिल्ह्यातील जि. प. शाळा - २,४९१
खासगी अनुदानित शाळा - ७४९
खासगी विनाअनुदानित शाळा - ४३७
एकूण विद्यार्थी - ५,८६,४५३
कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली - ४४,८७७
दुसरी - ५०,७९०
तिसरी - ५३,२९७
चौथी - ४९,८९५
पाचवी - ५२,८३३
सहावी - ५२,८९७
सातवी - ५२,०१४
आठवी - ५१,८०२
नववी - ४९,८९३
दहावी - ४८,९८३
अकरावी - ४२,४४०
बारावी - ३६,७३२
----------