पंचनामे होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST2021-03-04T05:04:10+5:302021-03-04T05:04:10+5:30
अंबाजोगाई : तालुक्यात आठवडाभरापूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज व पिकांचे नुकसान झाले ...

पंचनामे होईनात
अंबाजोगाई : तालुक्यात आठवडाभरापूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज व पिकांचे नुकसान झाले आहे. हरभरा व ज्वारी भिजल्याने ज्वारी काळी पडू लागली आहे. तर हरभरा डागील झाला आहे. गव्हाचे पीकही पांढरे पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. या नुकसानीचे महसूलने अद्यापही पंचनामे केले नाहीत.
बाजारातून मोबाईलची चोरी
बीड : शहरातील बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांच्या मोबाईलची चोरी होत आहे. हा प्रकार दर बाजारात नित्याचाच झालेला आहे. आठवडी बाजारात मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
गव्हाचे नुकसान
धारूर : तालुक्यात झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे गहू जमीनदोस्त होऊन नुकसान झाले आहे. चांगला आलेला गहू आता या पावसाच्या फटक्यामुळे पांढरा पडतो की काय? अशी भीती आहे.
नियमांचे पालन करा
माजलगाव : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून मास्क लावणे तथा सामाजिक अंतराचे पालन करणे तसेच कोरोना नियमांचे पालन व उपाययोजनांसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.
स्थानकाची दुरवस्था
मांजरसुंबा : येथील बसस्थानकात शौचालयासह इतर सुविधांचा अभाव आहे. तसेच दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. धुळे - सोलापूर महामार्गावरील तसेच लातूर, पुणे या मार्गावरील बसेस येथे थांबतात. स्थानकात सुविधा देण्याची मागणी होत आहे.
रस्त्यांची दुर्दशा
सिरसाळा : येथील जिनिंगच्या पाठीमागील परिसरात खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना, वाहनधारकांना कसरत करतच रस्ता पार करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.