शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:48 IST

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे.

ठळक मुद्देसुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात : पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपास दिले प्रत्युत्तर

बीड : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. त्यांचे आरोप केवळ राजकीय द्वेषातून असतात, हे आता जनतेला माहीत झाले आहे, असे सांगून मयत शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारांना वैद्यनाथ वर बोलण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सुनावले.राष्ट्रवादी काँग्रेसने काल परळी येथे जो मोर्चा काढला ते एक नाटक होते. हा मोर्चा मुळातच पंकजा मुंडे यांना विरोध करण्यासाठी होता, हे सिद्ध झाले आहे. धनंजय मुंडे यांनी मोर्चात पंकजा यांच्यावर केलेले आरोप हे केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असून त्यांचा राजकीय द्वेष यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला असल्याचे आ. धस यांनी म्हटले आहे. पोषण आहारा संदर्भात पंकजा यांच्यावर त्यांनी केलेला आरोप तर हास्यास्पद आहे, एवढे मोठे संवेधानिक पद असताना कुठलाही अभ्यास न करता बेछूट आरोप करण्याची सवयच त्यांना लागली आहे, सभागृहात ते पंकजा यांच्यावरील एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळेच आता निवडणुकीचे निमित्त साधून हा रडीचा डाव ते खेळत आहेत असे ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष रसातळाला चालल्याने ते व त्यांचे नेते बिथरले असून आरोप करण्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता पुन्हा एकदा त्यांना चांगली अद्दल घडवणार आहे, असे ते म्हणाले.तोडीपाणी करता, मग शेतकºयांचे पैसे का देत नाहीत ? : धसजगमित्र कारखाना काढतो म्हणून धनंजय मुंडे यांनी अनेक शेतकºयांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना खोटे चेक दिले, पैसे लाटले. याप्रकरणी शेतकºयांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे, असेही आ. धस म्हणाले.तोडीपाणीचे राजकारण करता, मग त्या शेतकºयांचे पैसे का देत नाहीत? तुमचे शेतकºयांवर खरचं प्रेम असेल तर त्यांच्या लुबाडलेल्या जमिनीचा अगोदर हिशेब द्या मगच वैद्यनाथबद्दल बोला असे आ. धस म्हणाले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात पंकजा यांनी कारखाना अतिशय हिंमतीने चालवला आहे. आतापर्यंत ऊस उत्पादकांना ६५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.वैद्यनाथ कारखान्याच्या शेतकºयांची उर्वरित रक्कमही पंकजा मुंडे लवकरच देणार आहेत. त्यासाठी कर्ज मंजूर होणारं आणि पैसे मिळणार असं दिसलं की सर्व माहिती घेऊन धनंजय मुंडे यांनी मोर्चा त्यांनी काढला.तथापि पंकजा यांनी कठीण परिस्थितीतून कारखान्याला बाहेर काढले. त्यामुळे शेतकºयांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सभासदांना त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन मदत केली आहे.मात्र, धनंजय मुंडे केवळ सुडाचे राजकारण करून संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका आ. सुरेश धस यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे