‘मास्कशिवाय प्रवेश नाही’, अंबाजोगाईत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST2021-03-07T04:31:20+5:302021-03-07T04:31:20+5:30
राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम अंबाजोगाई परिसरातही दिसून येत आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यात दररोज किमान ...

‘मास्कशिवाय प्रवेश नाही’, अंबाजोगाईत जनजागृती
राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम अंबाजोगाई परिसरातही दिसून येत आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यात दररोज किमान १५ च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होत आहेत. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन या विविध संस्थांच्या पुढाकाराने सरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.
या पोस्टर व फेरीचे उद्घाटन नायब तहसीलदार स्मिता बाहेती यांच्या हस्ते झाले. नगरपालिकेचे कार्यालयीन व्यवस्थापक ए. जे. चव्हाण, रोटरी क्लबचे उपप्रांतपाल संतोष मोहिते, सचिव कल्याण काळे, स्वप्निल परदेशी, प्रदीप झरकर, प्रवीण चोकडा, शकील शेख, गोरख मुंडे, अजित देशमुख, सचिन बेंबडे, बाळासाहेब कदम, जगदीश जाजू, दामोदर थोरात, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, अ. र. पटेल, सुदर्शन रापतवार, गजानन मुडेगावकर, राम सारडा, गणेश राऊत, धनराज सोळंकी, संजू गौड, डॉ अनिल केंद्रे, रुपेश रामावत, भागवत कांबळे, अरुण आसरडोहकर आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
060321\avinash mudegaonkar_img-20210306-wa0096_14.jpg
===Caption===
कोरोनापासून सुरक्षेसाठी अंबाजाेगाईत जनजागृती करत व्यापाऱ्यांना पोस्टरचे वाटप करण्यात आले.