सहकार्य मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:19+5:302021-06-22T04:23:19+5:30
अंमलबजावणी होईना बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत ...

सहकार्य मिळेना
अंमलबजावणी होईना
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
रानडुकरांचा त्रास
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. त्रास शेतकऱ्यांना होत आहे. त्याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरावस्था
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत लक्ष दिले जात नाही.
हातपंप दुरूस्ती होईना
बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरूस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना हातपंप दुरूस्त करून घ्यावेत, अशी मागणी सरपंच विक्रम खंडागळे यांनी केली.