नित्रुडचे मंडल अधिकारी कार्यालय शोभेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:47+5:302021-07-04T04:22:47+5:30
माजलगाव : तालुक्यातील नित्रुड येथील निवासी तलाठी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात ...

नित्रुडचे मंडल अधिकारी कार्यालय शोभेलाच
माजलगाव : तालुक्यातील नित्रुड येथील निवासी तलाठी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात वापर होत नसल्याने तलाठी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत तशीच पडून आहे.
माजलगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नित्रुड येथील तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी शासनाच्या वतीने गावातील बाजार तळावर लाखो रूपये खर्च करून तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत वापराविना तशाच धूळखात पडून आहेत. या इमारतीत सद्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सध्याची येथील उपकेंद्राची इमारत ही मोडकळीस आलेली आहे. तरी नवीन तलाठी निवासी इमारत व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत वापरात आणावी नसता आरोग्य उपकेंद्रास द्यावी, अशी मागणी अर्जुन तातोडे यांनी केली आहे.
030721\03bed_8_03072021_14.jpg